मानवाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास: जन्मापासून मरेपर्यंत व्यक्तीचे समाजात राहताना इतर व्यक्ती, समूह यांच्याशी परस्परसंबंध येत राहतात व सामाजिक वर्तन घडत राहते. या सामाजिक वर्तनाचा अन्वयार्थ लावणे हे मॅक्स वेबरच्या मते, समाजशास्त्राचे उद्दिष्ट आहे. व्यक्ती इतर व्यक्तींशी, समूहांशी कशी वागते, त्यांना कशी प्रभावित करते व स्वतः कशी प्रभावित होते, या बाबी अभ्यासणे समाजशास्त्राच्या दृष्टिने आवश्यक व महत्त्वाच्या आहेत.
सामाजिक संबंध काल व परिस्थितिसापेक्ष असतात. वडिलांच्या मृत्यूनंतर एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारी भावंडे; शेताच्या, घराच्या वाटण्यांसाठी एकमेकांचे वैरीही होतात. काल मुलींना शिकण्यास प्रतिबंध होता, हुंडा मागणे हक्क समजला जात असे, पण यात आज फरक पडला आहे
सामाजिक संबंधातूनच विवाह, कुटूंब, कुल, मालमत्ता, शिक्षण, धर्म, राज्य इत्यादी संस्था निर्माण होतात. तसेच अनेक समूह निर्माण होतात. त्यामुळे या समूहांचे, संस्थाचे प्रकार, उद्दिष्टे, कार्ये इत्यादी बाबींचे आकलन होण्यासाठी सामाजिक संबंधाचा अभ्यास समाजशास्त्राला करावा लागतो. यावरुन ज्या सामाजिक संबंधामुळे व्यक्तीचे सामाजिक वर्तन घडत असते तो समाजशास्त्राचा केंद्रस्थ्सानी असलेला अभ्यासविषय होय.
Details
- Publication Date
- Jan 18, 2021
- Language
- Marathi
- ISBN
- 9781716216763
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): अशोक यक्कलदेवी
Specifications
- Format
- EPUB