भाषा आणि भाषांतर विमर्श
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
भाषा ही मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जगामध्ये अनेक भाषा आहेत. भाषेचं नातं समाजाशी, साहित्याशी आहे तसेच मानवी जीवनाशी आहे. मानवी जीवनाला स्वयंपूर्तता प्राप्त करण्याचे सामर्थ्य भाषेमध्ये आहे, म्हणून जगातील कोणतीही भाषा संकेतावर आधारलेली आहे. भाषेमधून मानवी जीवन, समाज जीवन, सांस्कृतिक जीवन अभिव्यक्त होते. त्यामुळे भाषेची कुळ संकल्पना अभ्यासणे ही महत्त्वाचे आहे. कारण कालपरत्वे जगामध्ये अनेक राजवटी निर्माण झाल्या, त्या राजवटीचा परिणाम समाज जीवनावरती झालेला आहे आणि या समाज जीवनाचे चित्रण साहित्यिकांनी साहित्य कृतीमधून केले आहे. त्यामुळे त्यामध्ये वैचारिक मंथन कालपरत्वे भाषेमधूनच झालेले आहे हे नाकारता येत नाही. मानवी भाव-भावना, विचारकल्पना, सामाजिक जाणीवा भाषेमधून अभिव्यक्त होतात. त्यामुळे भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे जागतिक भाषाभ्यासकांनी मान्य केलेले आहे. भाषा ही आदिम काळापासून अनंतकाळापर्यंत मानवी जीवनासोबत सोबत करणारी आहे. भाषेतूनच साहित्य अभिव्यक्त होते. त्यामुळे भाषेचा तौलनिक पद्धतीने अभ्यास होत आहे.
Details
- Publication Date
- Aug 5, 2024
- Language
- Marathi
- ISBN
- 9781304210319
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ . दयानंद लिंबाजी भोवाळ
Specifications
- Format
- EPUB