
पिकवा मासे - कमवा पैसे
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
नैसर्गिकरित्या साठलेल्या किंवा कृत्रीमरित्या तयार केलेल्या जलाशयातील तसेच नद्यांच्या पाण्यातून मासे पकडणे, पकडलेले मासे टिकवणे व त्याची विक्री करणे यास ‘मत्स्यव्यवसाय’ म्हणतात. पाण्यात राहणारे सजीव पाण्याबाहेर काढणे यालासुध्दा मत्स्यव्यवसाय म्हणतात.
मत्स्यवसायमाध्ये मासा हा मुख्य प्राणी आहे. मास्याबरोबर इतर ही सजीव पाण्यात राहतात. या सजीवांचा मानवास अन्न तसेच इतर मार्गाने उपयोग होतो. या प्राण्यांचाही ‘मत्स्यव्यवसाय’ समावेश केलेला आहे. झिंगा, मृदूकाय प्राणी इत्यादींचा समावेश मत्स्यव्यवसाय होतो.
पाण्याच्या प्रकारावरून मत्स्यव्यवसायाचे प्रकार पडतात. सागरातून मासे व इतर माणसोपयोगी सजीव मिळविण्याला ‘सागरी मत्स्यव्यवसायात’ म्हणतात. जमिनीवरील पाण्याच्या साठयातून सजीव मिळविण्याला ‘गोडया पाण्यातील मत्स्यव्यवसाय’ म्हणतात. पाण्यातून सजीव मिळविण्याला ‘निमखाÚया पाण्यातील मत्स्यव्यवसाय’ म्हणतात.
नद्या, तळी, सरोवर, विहिर इत्यादी ठिकाणी मिळणारे पाणी याला आपण गोडे पाणी म्हणतो. या पाण्यातून चालणारा मत्स्यव्यवसाय वेगवेगळया नावांनी ओळखला जातो. उदा. सरोवरातील मासेमारी, नद्यातील मासेमारी, तलावातील मासेमारी इत्यादी.
Details
- Publication Date
- Sep 11, 2021
- Language
- Marathi
- ISBN
- 9781329766280
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. मोहन गणपतराव बाबरे
Specifications
- Format
- EPUB