अध्यापन अभिक्षमता व व्यावसायिक समाधान : सहसंबंध
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानला जातो. पण विद्यार्थ्याला घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका शिक्षकाची असते म्हणून विद्यार्थ्याचे यशापयश हे प्रामुख्याने शिक्षणावर अवलंबून असते. पौगंडावस्था हा मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण हा टप्पा जीवनातील पुढची दिशा निश्चित करतो म्हणून या टप्प्यावर मिळणारे औपचारिक शिक्षणसुध्दा तेवढेच महत्त्वपूर्ण ठरते. औपचारिक शिक्षण पध्दतीत माध्यमिक स्तरावरील शिक्षण म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वागिण विकास करणारे शिक्षण असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या स्थापनेसाठी इ.स. १९६५ मध्ये कायदा क्र. XLI च्या पान दोनवर माध्यमिक शिक्षणाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे." माध्यमिक शिक्षण म्हणजे कुमारवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिले जाणारे सर्वसामान्य तांत्रिक व व्यावसायिक अगर विशेष शिक्षण होय. तसेच प्राथमिक शिक्षणानंतर लगेच दिले जाणारे आणि भारतातील कायद्यान्वये निर्माण झालेल्या विद्यापीठाकडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या शिक्षणापूर्वी मिळणारे शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षण होय. "
Details
- Publication Date
- Aug 22, 2023
- Language
- Marathi
- ISBN
- 9781387041770
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. शोभा मारुती कांबळे
Specifications
- Format
- EPUB