चिंतन (भाग - ३)
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
हे टाळता येणार नाही कां ?
दि. २० एप्रिल रोजी कराडला जाण्याचा योग आला. तेथे मागच्या
१०-१५ वर्षापूर्वी बांधलेला एक भला मोठा उड्डाणपूल पाडण्याचे काम चालू होते. त्या पुलामुळे तेथील नागरिकांना त्याचा खूपच त्रास होत होता. वाहतुकीमध्ये खूप अडचणी येत होत्या असे तेथील नागरिकांनी सांगितले. ताबडतोब याची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन पूल बांधण्यास सुरुवात केली.
असाच प्रकार पुण्यातील कोथरुड भागातील चांदनी चौक येथील उड्डाणपूला बाबतही घडली. तेथेही नवीन पूलाचे काम चालू आहे व १-२ महीन्यात अत्यंत सुंदर पूल पहावयास मिळणार आहे.
साधारणपणे २०-२५ वर्षापूर्वी पुणे विद्यापीठ गेट जवळ बांधलेला पूल देखील पाडून तेथे नवीन पूल बांधला जाणार आहे. वास्तविक हा पूल सकृतदर्शनी तरी अत्यंत भक्कम वाटत होता. हे तिन्ही पूल फार जुने नव्हते. इतकेच काय परंतु ते ज्यावेळी तयार केले गेले होते त्यावेळी या पुलांच्या बांधकामाबद्दल कौतुकच वाटत होते. याऊलट इंग्रज सरकारच्या काळात सांगलीजवळ चा आयर्विन पूल १०० वर्षे वयाचा आहे व आता तो वाहतुकीसाठी बंद केला आहे.
Details
- Publication Date
- Jul 12, 2024
- Language
- Marathi
- ISBN
- 9781304496973
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. ह. ना. जगताप
Specifications
- Format
- EPUB