
करोना मुळे आपणा सर्वांच्या जीवनात खूप बदल झालेले दिसतात अर्थात हे बदल तात्पुरते आहेत की, कायम स्वरूपाचे हे समजायला काही काळ जावा लागेल.
शिक्षक या नात्याने शिक्षणात झालेले होत असलेले बदल थोडे चिंता वाढविणारे आहेत असे वाटते. अगदी पूर्व प्राथमिक पासून ते पीएच. डी कोर्स वर्क पर्यंत डिजिटल शिक्षणाने अध्ययन अध्यापनाचे क्षेत्र व्यापले आहे. कदाचित हे वर्ष देखील डिजिटल शिक्षणाचेच असेल असे वाटते. करोना काळात या शिक्षण पद्धतीने खूपच चांगले काम केले आहे. वेगवेगळ्या अडचणींवर मात करून शिक्षक मित्रांनी अध्यापनाचे काम केले आहे.
परंतु ही व्यवस्था कायम स्वरूपी आपल्या मानगुटीवर बसते की, काय अशी मला भीती वाटते. यूजीसीने , अभ्यासक्रमाचा ४० % भाग डिजिटल रितीने पूर्ण करावा असा फतवाच काढला आहे. तसेच ३८ विद्यापीठांना ऑन लाईन पदवी अभ्यासक्रम राबविण्यास मान्यता दिली आहे. आणि या व्यवस्थेची व्याप्ती उत्तरोत्तर वाढत राहण्याची शक्यता वाढली आहे.
Details
- Publication Date
- Apr 29, 2022
- Language
- Marathi
- ISBN
- 9781435770461
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): डॉ. ह. ना. जगताप
Specifications
- Format
- EPUB