सतराव्या शतकातील मराठी सत्तेचा उदय ही युगप्रवर्तक घटना मानली जाते. इ.स.१६०० ते १८१८ या मराठा कालखंडाचे शिवशाही व पेशवाई असे दोन भाग पडतात. मराठयांचा इतिहास इ.स.१६०० पासून सुरू होत असला तरी मराठयांच्या स्वराज्याची चढती कमान इ.स.१६४६ पासून विस्तारली, पण त्याचा पाया शहाजीराजांच्या कालखंडातच रोवला गेला. खरे स्वराज्य संकल्पक हे शहाजीराजे आहेत. छ. शिवाजी, छ. संभाजी, छ. राजाराम, महाराणी ताराबाई, छ. शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत स्वराज्य स्थापन व स्वराज्य रक्षण करण्याचे कार्य झाले. २६ वर्षे चाललेल्या 'मराठयांच्या स्वातंत्र्ययुध्दात' मराठे मोगलांशी मोठया तडफेने लढले. मराठा सत्तेचा दुसरा कालखंड म्हणजे पेशवाईचा. पेशवाई कालखंडास मराठा सत्तेचा विस्तार व न्हास असे संबोधले जाते. अठराव्या शतकात मराठी सत्ता अखिल भारतीय स्वरुपाची झालेली होती. उत्तरेत माळवा, राजस्थान, बिहार, गुजरात, दिल्ली, ओरिसा अटकेपर्यंत तर दक्षिणेत कर्नाटकात तुंगभद्रा नदीपर्यंत मराठी सत्तेचा अंमल होता. पहिल्या चार पेशव्यांनी बलवान केंद्रसत्ता निर्माण करून मराठी साम्राज्याचा विस्तार केला.
Details
- Publication Date
- Aug 26, 2022
- Language
- Marathi
- ISBN
- 9781387770007
- Category
- Education & Language
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): प्रा.डॉ.स्वाती घाटुळे-चौगुले
Specifications
- Format
- EPUB