आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीतील लढवय्या योध्दा राजा ढाले

आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीतील लढवय्या योध्दा राजा ढाले

Byप्रा. डॉ. नरवाडे जळबा मेश्राम

This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण ही घटना भारतीय समाजासाठी कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. मानवमुक्तीच्या लढ्यासाठी बाबासाहेब शेवटच्या श्वासापर्यंत लढले. आंबेडकरोत्तर चळवळ त्यांच्या निर्वाणानंतर निर्माण झालेली चळवळ आहे. ही चळवळ रिपब्लिकन नेत्यांना जोमाने पुढे नेता आली नाही. यासाठी त्यांच्याकडे डॉ. बाबासाहेबांसारखा दूरदृष्टीकोन नव्हता. बाबासाहेब हयात असतांना त्यांच्या शब्दाबाहेर जाण्याचे कुणाचे धाडस नव्हते परंतु निर्वाणानंतर ही परिस्थिती राहीली नाही, भैय्यासाहेब व माईसाहेब एकत्र येणार नाहीत ह्याची तत्काल्दीन पुढाऱ्यांनी काळजी घेतली. बाबासाहेबानंतर समाजाचे नेतृत्व आपल्याकडेच राहील ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समोर येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकात ही बेदिली दिसली नाही. त्यामुळे शेकाफे ला घवघवीत यश येऊन आठ खासदार व १७ आमदार निवडून आले. पुढे ह्या पुढाऱ्यांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली. दोन वर्ष या पक्षाने दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी खडतर परिश्रम घेतले. परंतु दोन वर्षातच पक्ष दुभंगण्याचे चिन्हे दिसू लागली स्वतः भैय्यासाहेब आंबेडकरांनी पक्षात एकी कशी राहील यासाठी प्रयत्न केले

Details

Publication Date
Jun 18, 2024
Language
Marathi
ISBN
9781312186026
Category
Education & Language
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): प्रा. डॉ. नरवाडे जळबा मेश्राम

Specifications

Format
PDF

Ratings & Reviews