माझी आई
ByDr. Ashok Shivaji Yakkaldevi
This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
माझी आई हे निबंध पुस्तक आपल्यासमोर प्रकाशित करताना मला खूप आनंद होत आहे अगदी कळत्या वयापासून शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्यात कधीच विस्मरण होत नाही अशी एकमेव अनमोल व्यक्ती म्हणजे आई. आज ए. आर. बुर्ला कॉलेजमधील अनेक विद्यार्थांनी आपल्या आईचे कार्य,कर्तव्य, काबाडकष्ट, संघर्षमय जीवन ,आई विषयी असलेली भावना व्यक्त केल्यानंतर ते एकत्रित करून माझी आई या निबंधरुपी अनमोल ठेवा तयार करताना खूप आनंद होत आहे. लिहिल्याशिवाय कधी व्यक्त होत आई विषयी असलेली भावना आज कळत्या वयात कॉलेज जीवनात व्यक्त करताना विद्यार्थयाना खूप अत्यानंद वाटत आहे. आई या शब्दातच तीच अर्थ दडलेले आहे. आ म्हणजे आजन्म साथ देणारी, आई म्हणजे ईश्वराकडून मिळालेली देणगी म्हणजे आजन्म साथ देणारी ईश्वराकडून मिळालेली देणगी म्हणजे आई होय. जी आपल्याला जन्मापासून ईश्वराकडून प्रत्येकाना मिळालेली ही अनमोल देणगी आहे. आई विषयी व्यक्त होताना खरोखरच खूप आनंद होतो. कारण आई विषयी आज पर्यंत कथा कादंबरी कविता चरित्र-आत्मचरित्रात अनेक नामवंत लेखक व कवींनी आपल्या भावना मांडलेले आहेत. पण आज कष्टकऱ्यांची, कामगारांची, दोन वेळच्या जेवणासाठी धडपड करणाऱ्या, संकटातून मार्ग काढून संसाराची गाडी सन्मानाने अभिमानाने हकणारी आईची हाल-अपेष्टा कॉलेजमधील अनेक विद्यार्थी या निबंधात शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या भावना आज एका आगळावेगळा उपक्रमातून आपल्यासमोर सादर करताना मला खूप आनंद होतो.
Details
- Publication Date
- Nov 4, 2022
- Language
- English
- ISBN
- 9781716766787
- Category
- Business & Economics
- Copyright
- All Rights Reserved - Standard Copyright License
- Contributors
- By (author): Dr. Ashok Shivaji Yakkaldevi
Specifications
- Format
- EPUB