बॉल बॅडमिंटन खेळाची सद्यस्थिती

बॉल बॅडमिंटन खेळाची सद्यस्थिती

ByDr. R.M. Suryawanshi

This ebook may not meet accessibility standards and may not be fully compatible with assistive technologies.
१.१ प्रस्तावना मराठवाडा ही संताची आणि महंताची भूमी म्हणून ओळखली जाते. भोगोलिक समृध्दी प्राप्त न झाल्यामुळे त्याचा परिणाम या भागातील सर्वच क्षेत्रात दिसून येतो. भौगोलिक संपत्रतेमुळे सगळयाच कला विकसित होत असतात. संपत्रतेमुळे मिळणारा वेळ आणि पैसा ही आज एक जमेची बाजू म्हणून ओळखली जाते तर दुसरीकडे याच संपत्रपतेमुळे येणारे उद्योगीकरण, यांत्रिकीकरण आणि त्यामुळे निर्माण होणारे शहरीकरण त्यातून निर्माण होणारे मानसिक ताणतणाव, शारीरिक विकार यामुळे जीवनशैलीमध्ये प्रचंड अशी उलथापालथ होताना दिसते आहे. या सगळयावर उत्तम उपाय म्हणून आज मनोरंजन आणि खेळ या प्रकराकडे पाहिले जाते. शारीरिक शिक्षणाचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला पाश्चात्य ग्रीक आणि रोमन संस्कृतीपर्यंत जावे लागते. त्या काळात शारीरिक शिक्षणाचे मुख्य काम समान संरक्षण होते.१ युरोपमध्ये मध्ययुगात आणि आपल्याकडे शिक्सलापर्यंत सामान्य लोकांना शारीरिक शिक्षण दिले जात नव्हते; परंतु कुस्ती किंवा मल्लयुदासारखे विविध क्रीडा प्रकार त्याचे मूळ संदर्भ रामायण, महाभारतात दिसून येतात. ब्रिटीशांच्या आगमनाने भारतीय समाजाचे भाग्यच उनले युरोपियन संस्कृती आणि समाज यांच्या संपर्काने खऱ्या अर्थाने आमुलाग्र असा बदल घडून आला. शाळा आणि महाविद्यालयाच्या स्तरावर शारीरिक शिक्षण हा विषय शिकविण्यास सुरूवात झाली. त्यामागचा हेतु जरी संरक्षण असला तरी भारतीयांना या सगळयाच पाश्चात्य संस्कृतीची आवड निर्माण झाली आणि पाश्चात्य खेळाचे लोण आपल्याकडे आले. त्यामध्ये लष्करी शिस्तीचे शिक्षण, कवायती तसेच क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि अॅथलेटिक्स यासारखे खेळ विशिष्ठ अशा समूहासाठीच खेळवले जात.

Details

Publication Date
Nov 25, 2023
Language
English
ISBN
9781304942340
Category
Education & Language
Copyright
All Rights Reserved - Standard Copyright License
Contributors
By (author): Dr. R.M. Suryawanshi

Specifications

Format
EPUB

Ratings & Reviews